Share

भारतात कोरोनाचा हाहाकार ; कॅनडा करणार १० मिलियन डॉलरची मदत

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी देशात जवळपास साडेतीन लाख कोरोना रुग्ण आढळून आलते. गेल्या सलग चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे आढळून येत आहे. देशात आरोग्यसेवा कमी पडू लागल्या आहे, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे झालेल्या विध्वंसानंतर आता अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. भारताला सावरण्यासाठी रशिया आणि अमेरिकेसारख्या बड्या देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर आता कॅनडाही भारताच्या मदतीसाठी धावून आला आहे. कॅनडाने भारताला १० मिलियन डॉलर म्हणजे ७४ कोटी ३९ लाख ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनडाकडून भारताच्या रेड क्रॉस सोसायटीला १० मिलियन डॉलरचा निधी देण्याची घोषणा केली आहे. कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय विकास मंत्री करीना गोल्ड यांनी ही घोषणा केली आहे. भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचं गोल्ड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे भारतात दररोज पाच हजार लोकांचा मृत्यू होईल असा धक्कादायक निष्कर्ष वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात समोर आला आहे. सध्या सातत्याने भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढतेय. एप्रिल ते जुलै या काळात भारतातील तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!