मुंबई – राज्यभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मृतांवर अत्यंस्कार करण्यासाठीही जागा नसल्याचे समोर येत आहे.एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला एक संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईत घडला आहे.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या २२ रुग्णांचे मृतदेह एकाचा रुग्णवाहिकेत कोंबण्यात आले होते. या प्रकारामुळे स्वाराती रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचे जिवंत असताना आणि मृत्यू झाल्यानंतर देखील हाल होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले.
दरम्यान, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी याच मुद्द्यावरून सरकार आणि प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. बीड जिल्ह्यात अंबेजोगाई तालुक्यात ज्याप्रमाणे कोविड मृतदेहांसोबत अमानवीय व्यवहार झाले. २२ कोविड मृतदेहांना एका व्हॅन मध्ये भरून अंतिम संस्करांसाठी नेण्यात आले. ही घटना मानवतेला कलंकित करणारी अशी घटना आहे असे त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या जनतेला औषध, बेड किंवा ऑक्सिजन देण्यात अपयशी ठरलं आहे. महाविकास आघाडी सरकारचं एकच धोरण आहे. फक्त आणि फक्त वसूली. महाराष्ट्राच्या जनतेशी त्यांना काहीही देणं घेणं नाही. आम्ही या पूर्ण घटनेचा तीव्र निषेध करतो असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकुड पुरवठा
- परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
- ‘राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आणि भिन्न विचारांचे असल्याने त्यांच्यात ताळमेळ नाही’
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नावनोंदणी कशी कराल ? जाणून घ्या सोपी प्रक्रिया


