मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन जाहिर केले आहे. कोरोनाच्या या काळात अनेक रुग्ण हे ऑक्सिजन आणि अपुऱ्या औषधामुळे बळी पडत आहे. कोरोनाच्या या लाटीत बॉलिवुड अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप पुढे येत ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत केली आहे.
आयुषमान खुराना आणि पत्नी ताहिरा कश्यप यांनी सोशल मीडीयावर एक पत्र अपलोड केले आहे. या पत्रात ते म्हणतात, ‘मागील वर्षापासून आपण या विषाणुशी लढा देत आहोत. या लढ्यात अनेकांची मने दुखावली, अनेक वेदनातुन हा काळ जात आहे. मात्र या संकटाच्या काळातही आपण एकत्र राहुन दाखवुन दिले. आता हा विषाणु पुन्हा एकदा आपल्याला एकत्र येण्याचे अवाहन करत आहे. यादरम्यान देशातील विविध भागातुन मदतीचा हात पुढे आला. या कठिण काळात मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिचे मी आणि ताहिरा धन्यवाद म्हणतो.
https://www.instagram.com/p/COKSaWhptV5/
या पत्रात ते पुढे म्हणाले की,’तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळे आम्ही अमच्याकडून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्याच्या गरजेच्या काळात आम्ही ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये आम्ही आमचे योगदान केले आहे.’ तसेच त्यांनी भारतीयाना अवाहन केले आहे की या संकटाच्या काळात पुढे येउन आपले योगदान द्यावे. आयुषमान आणि ताहिरा यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
महत्वाच्या बातम्या
- लस देण्याची घोषणा केलीत पण केंद्र सरकारकडे लसींचा साठा आहे का?: पृथ्वीराज चव्हाण
- ‘एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबण्याची घटना मानवतेला कलंकित करणारी’
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- उस्मानाबाद जिल्ह्यात प्लास्मा देण्याऱ्यास पाच हजाराचे बक्षीस
- ‘आता देशालाही उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र मॉडेल प्रमाणेच चालावे लागेल’


