🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटेमध्ये अनेक सर्वसामन्यांप्रमाणे बड्या राज्यकर्त्यांनादेखील विळखा घातला आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांच्यावर कोरोनाचे उपचार देखील चालू होते.
परंतु आज सकाळी १० वाजता एकनाथ गायकवाड यांचं दु:खद निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड हे महाविकास आघाडीतील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.
ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. गायकवाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, आयुष्यभर त्यांनी काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार तेवत ठेवला. राजकारणात अनेक चढ-उतार सोसले. पण कधीही आपल्या तत्वांचा त्याग केला नाही.
युवक काँग्रेसपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आमदार, मंत्री, खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी बहरत गेली. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण आपली साधी राहणी व कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी कधी सोडला नाही. ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे व कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. त्यामुळेच प्रदीर्घ काळ आमदार व खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवली होती. एकनाथ गायकवाड यांच्यावर काळाने कोरोनाच्या रूपात घातलेला घाला काँग्रेस पक्ष आणि समाजासाठी मोठी हानी आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो व आमच्या सहकारी प्रा. वर्षाताई गायकवाड तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी प्रार्थना करतो.
महत्वाच्या बातम्या
- विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांसोबत गडकरी-फडणवीस यांची बैठक
- आयुष्यमान भव:, कोरोना संकटासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत, चाहत्यांनाही केले आवाहन
- लस देण्याची घोषणा केलीत पण केंद्र सरकारकडे लसींचा साठा आहे का?: पृथ्वीराज चव्हाण
- ‘एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबण्याची घटना मानवतेला कलंकित करणारी’
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
