Share

लस देण्याची घोषणा केलीत पण केंद्र सरकारकडे लसींचा साठा आहे का?: पृथ्वीराज चव्हाण

Published On: 

कराड : संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.

दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलेले आहे. ‘देशात अद्याप 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले नसताना केंद्र सरकारने 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. अगोदरच लसींचा तुटवडा असताना आता 18 वर्षांवरील नागरिकांना लस कुठून देणार,’ असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. भारत देशात 140 कोटी लोकसंख्या असून सध्या 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण अजुन पुर्ण झाले नसुन तरीदेखील 18 वर्षावरील सर्वांना लसीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तेवढी लस भारतात आहे का, याचचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अन्यथा 1 मे नंतर गर्दी झाली तर हे दुर्दैव म्हणावे लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!