Share

भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या महिलेसह वाहन चोरट्यांनी तिघांच्या दुचाकी लांबविल्या

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या महिलेची तर दोघांच्या दुचाकी चोराने घरासमोरुन चोरट्यांनी लांबविल्या. या तिन्ही घटना २० ते २२ जून दरम्यान भरदिवसा घडल्या आहे. सिडकोतील महिला जाधववाडी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी गेली होती.

त्यावेळी महिलेने बागडे संकुलासमोर दुचाकी (एमएच-२०-सीडब्ल्यू-९४१६) उभी केली होती. चोराने त्यांची हँडल लॉक तोडून लांबवली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राहुल मच्छिंद्र सोनवणे (वय २८, रा. म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप परिसर) याने २२ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२०-ईएस-४११३) उभी केली होती.

चोराने त्याची दुचाकी दोन तासात लांबवली. तसेच सुखलाल कान्हुचंद रमंडवाल (वय ३३, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) यांची दुचाकी (एमएच-२०-डीएम-५७६५) २० जून रोजी मध्यरात्री घरासमोरुन लांबवली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व प्रकरणांचा तपास पोलिस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!