Share

‘दरोडेखोराला अटक करतात तसं केंद्रीय मंत्र्याला अटक केलं, वा! काय पराक्रम केलाय’

Published On: 

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जात आहे. या यात्रेमध्ये राणे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं आहे.

दरम्यान, रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ‘जसं एका दरोडेखोराला अटक करतात, तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे? महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही,’ असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

‘आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर ऍसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर ऍसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे,’ असं विधान करत त्यांनी सूचक इशारा दिला असून हा इशारा नेमका कोणाला आहे यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!