Share

‘माझा घसा ठिक होऊ दे, आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार’, राणेंचा टोला

Published On: 

रत्नागिरी: जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाना साधला आहे. यावेळी त्यांनी सध्या आवाज खराब आहे. मात्र आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर खणखणीत वाजवणार असा इशारा शिवसेनेला दिला आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला. एखाद्या दरोडेखोराप्रमाणे मला अटक करण्यात आली. मी शिवसेनेसोबत थोडीथोडकी नव्हे, ३९ वर्षे होतो. त्यामुळे माझ्याकडे बराच मसाला आहे, असे सूचक वक्तव्य करत राणेंनी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

तसेच मंत्री राणे यांनी काही जुन्या वादांवरही भाष्य केले आहे. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे? आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर  अ‍ॅसिड  फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड  फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!