रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जात आहे. या यात्रेमध्ये राणे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं आहे.
दरम्यान, रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधानानंतर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राणेंच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या आंदोलनाचा देखील चांगलाच समाचार घेतला. ‘सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे माघारी जाणार नाही,’ असा इशारा वजा आव्हान राणे यांनी दिलंय.
‘आमच्या घरासमोर वरुण सरदेसाई आला होता. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेव्हढी त्याला आहे. त्याने मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या मुलांनी एव्हढा चोपला ना.. आता परत आला तर परत नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, आम्ही नाही सोडणार. आणि तो वरुण येऊ देच,’ असं भाष्य नारायण राणे यांनी केलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘राणेंच्या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून उध्दवजींच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे’
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
