मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जात आहे. आजपासून राणे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी कोकण सज्ज झाले आहे. मुख्यतः कणकवली हा राणे परिवाराचा बालेकिल्ला आहे. कणकवलीत राणेंच्या होणाऱ्या स्वागताची सर्वांना उत्सुकता आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरभर यात्रेच्या स्वागताचे आधीच फलक लागले आहेत. रात्री राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर मध्यरात्री शहरात गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. शहरात पटवर्धन चौकात रस्त्याच्या बाजूला रात्री गुढ्या उभ्या केल्या गेल्या. मुख्य चौकात आकाश कंदील लावले गेलेत. एकंदरितच कणकवलीतील राणेंचं स्वागत जंगी होणार आणि राणेसमर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपाकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज रत्नागिरीत पार पडणार आहे. दरम्यान, राणेंच्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
म्हणूनच त्यांनी सिंधुदुर्गात कलम १४४ लागू केले आहे. मात्र नारायणरावजी राणे यांची यात्रा सूरूच राहणार असून त्यांच्या या यात्रेला हार्दिक शुभेच्छा !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 27, 2021
पाटील आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, केंद्रीय मंत्री मा. नारायणरावजी राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरू होत आहे. यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून उध्दवजींच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच त्यांनी सिंधुदुर्गात कलम १४४ लागू केले आहे. मात्र नारायणरावजी राणे यांची यात्रा सूरूच राहणार असून त्यांच्या या यात्रेला हार्दिक शुभेच्छा !
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

