पुणे : बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खानने ‘ देश घडवणारे खरे शासक हे मुघल होते’ असे विधान केले होते. कबीर खानने केलेल्या या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी प्रतिक्रिया देत कबीर खान याचा चांगलाच समाचार घेतलाय.
‘कबीर खान याच डोक ठिकाणावर आहे का ? मुघलांनी राष्ट्र निर्माण केले असं म्हणत आहे हा वेडा.धर्मावर आधारित स्वतः निर्माण केलेले देश सुद्धा यांना अखंड ठेवता आले नाहीत आणि भारत निर्मितीचे श्रेय घेऊ पाहत आहेत हे मुघल राष्ट्र निर्माते नव्हे तर राष्ट्राचे तुकडे करणारेच आहेत, तूझ्या पूर्वज लोकांना बाटवणारे पण मुघलच होते,’ असं दवे यांनी म्हटलंय.
‘काही शेकडोच्या संख्येने केवळ संपत्ती लुटण्याच्या निम्मिताने ही गांजाडी लोक नशेच्या भरात भारतात येत होते आणि सुरवातीच्या काळात तर लूट घेऊन परत पण जात होते. पण शेकडो वर्षांच्या अथक लुटीने सुद्धा ना यांची विकृती संपली ना इथला खजिना! तेव्हा मात्र त्यांनी इथंच राहून या देशाला लुटायचं ठरवलं आणि धार्मिक युद्ध अवलंबलं जे यांना 1400 वर्षात जिंकता आले नाही,’ असा हल्लाबोल दवे यांनी केलाय.
पुढे ते म्हणाले, ‘पण आजून सुद्धा तो यांच्या DNA मधे असलेला विचार जात नाही म्हणून मग असे घाणेरडे विचार यांच्या डोक्यात येतात. म्हणूनच मग कधी यांना असुरक्षित वाटतं तर कधी झोप येत नाही, कधी पोलिसांना बाजूला सरकवायला सांगितलं जात तर कधी 15 मिनिटात हिंदूंना संपवू असं सांगितले जात. या देशाचे 2 नव्हे तर या आधीचे पण सर्व तुकडे हे धर्मावर आधारितच झालेत आणि मुघलांच्याच अतिरेकपणा नेच केले आहेत हे सत्य नाकरण्यात काय अर्थ आहे ? त्या मुळे मुघल हे या राष्ट्राचे निर्माते आहे हे वक्तव्य निव्वळ मूर्ख पणाचे आणि धर्मांध तर आहेच पण मुघल आक्रमक विरोधात लढणाऱ्या आमच्या राष्ट्र भक्तांचा पण अपमान आहे,’ असं म्हणत आनंद दवे यांनी कबीर खानच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही’; राणेंचा इशारा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘राणेंच्या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून उध्दवजींच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे’
- ‘माझा घसा ठिक होऊ दे, आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार’, राणेंचा टोला


