Share

दुचाकी चोरटा गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी

Published On: 

औरंंगाबाद : वाळूज परिसरातील महाविर चौकासमोरील ईएसआयसी हॉस्पीटल समोरून दुचाकी चोरणाऱ्या अंबर विठ्ठल देवकर (वय २१, फर्शी फाटा ता. फुलंब्री) याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुरूवारी अटक केली. अटकेत असलेल्या अंबर देवकर याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. दहातोंडे यांनी शुक्रवारी (दि.२८) दिले.

जामगाव (ता. गंगापुर) येथे राहणारे संतोष साईनाथ तागड (वय २७) हे २७ मे रोजी पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने तिला उपचारासाठी महाविर चौकातील ईएसआयसी हॉस्पीटल मध्ये घेवून गेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएम-७२५२) हॉस्पीटल समोर हॅन्डल लॉक करुन उभी केली.

संधी साधत चोरट्याने त्यांची दुचाकी लांबवली. तागड हे हॉस्पीटल मधून बाहेर आले असता, दुचाकी चोरीला गेल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेत असलेल्या चोरट्याच्या ताब्यातून पोलिसांनी संतोष तागड यांची दुचाकी जप्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!