नवी दिल्ली : लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही, तर मोदी सरकार खोटारडेपणावर बनले आहे, असेही ओवैसी म्हणाले.
एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘खोटं, खोटं आणि खोटं. मोदी सरकार खोटारडेपणावर बनले आहे. पंतप्रधान ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा. आपल्या महालातून बाहेर येऊन पाहा, देशातील गरीबांची काय परिस्थिती आहे.
झूठ, झूठ और झूठ।मोदी सरकार झूठ पर मबनी है।@PMOIndia ख़्वाब-ए-गफ़लत से बाहर निकलिए, अपने महल से बाहर आकर देखिए की मुल्क के ग़रीब का क्या हाल है।pic.twitter.com/KYJDyWNoO8
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 28, 2021
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून माध्यमांशी संवाद साधताना मोदींवर टीका केली आहे. त्यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका केली. आम्ही केंद्र सरकारला कोविड 19 च्या संकटाबाबत वारंवार इशारा गेत होते. पण पंतप्रधान मोदींनी कोरोनावर विजय मिळवल्याचंही जाहीर केलं. पण हा एक पसरत जाणार किंवा सतत बदलत राहणारा आजार आहे. त्यामुळं लॉकडाऊन किंवा मास्क परिधान करणं हा तात्पुरता उपाय असून लसीकरण हाच यावर कायमस्वरुपी तोडगा ठरू शकतो असं राहुल गांधी म्हणाले. केंद्र सरकारला त्यांचा सामना कशाशी आहे हेच समजत नसल्याचंही राहुल गांधींनी यावेळी म्हटलं.
या विषाणूच्या विकासाचा धोका लक्षात घेणं गरजदेचं आहे. आपण संपूर्ण जगासाठी किंवा पृथ्वीसाठी धोका निर्माण करत आहोत. कारण आपल्या लोकसंख्येच्या 97 टक्के नागरिकांवर हल्ला करण्याची संधी विषाणूला आहे. त्याचं कारण म्हणजे केवळ 3 टक्के नागरिकांचं आतापर्यंत लसीकरण झालं आहे. राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांनाही सुनावले. जर तुम्ही कोरोनाच्या मृत्यूचे आकडे लपवत असाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं असं राहुल गांधी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
- महाविकास आघाडी सरकार अडचणीत! मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव
- ‘..तरीही मोदींनी संभाजीराजेंना भेट द्यायलाच हवी’, राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचले
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- व्यापाऱ्याचे घर फोडून रोख, लॅपटॉप लंपा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

