बारामती : महाविकास आघाडी सरकारला १८ महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला होता. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले. केसाने गळा कापणे म्हणतात तसे, तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत म्हटले होते.
यावर राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांना टोले लगावत त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. ‘ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार, असे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच ‘आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल’, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याबाबत पवार म्हणाले की, ‘हे वक्तव्य पाटील यांनी जागे असताना केले होते की झोपेत? हे पाहावे लागेल असा टोला लगावत पाटलांच्या दाव्याची हवा काढून घेतली.’
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडी सरकार अडचणीत! मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव
- ‘..तरीही मोदींनी संभाजीराजेंना भेट द्यायलाच हवी’, राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचले
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- व्यापाऱ्याचे घर फोडून रोख, लॅपटॉप लंपास
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
