🕒 1 min read
जळगाव : मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकार योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही. म्हणूनच हे आरक्षण नाकारण्यात आले. राज्य सरकार तीन पक्षांचे असल्याने त्यांच्यात एकमेकांमध्ये मतभेद आहेत. मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री आरक्षणाला विरोध करतात. म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप भाजप नेते आ.गिरीश महाजन यांनी केला. ते जळगाव येथे बोलत होते.
महाजन म्हणाले की, भाजप सरकार असताना मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण देण्यात आले होते. आरक्षणाच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण बाजू तयार करण्यात आली होती. त्यानंतरच आरक्षण दिले गेले होते. तेव्हा उच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते. मात्र, सरकारने योग्य बाजू मांडल्याने ते आरक्षण टिकले होते. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात अपयशी ठरले.
मराठा समाजाचे आरक्षण कशामुळे नाकारले गेले, आरक्षण देण्यात कोण कमी पडले? याची छत्रपती संभाजीराजे भोसले यांना कल्पना आहे. ते आमच्याच पक्षाचे खासदार आहेत. ६ जून रोजी ते काय भूमिका घेतात? ते पाहूयात अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदीजी, ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
- महाविकास आघाडी सरकार अडचणीत! मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव
- ‘..तरीही मोदींनी संभाजीराजेंना भेट द्यायलाच हवी’, राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचले
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
