औरंंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरातील स्वयंघोषीत डॉन विशाल उर्फ मड्या किशोर फाटे (वय २७, रा.वडगांव-कोल्हाटी) याच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री मृगनयनी हॉटेलजवळ घडली होती. संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळातही हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी हॉटेल मृगनयनी बार अ;ॅण्ड रेस्टांरट सील केले आहे.
महेश हनुमान भोंडवे (रा.बजाजनगर) यांचे महाराणा प्रताप चौकात हॉटेल मृगनयनी बार अ;ॅण्ड रेस्टारंट आहे. शुक्रवारी रात्री या हॉटेलमधुन विशाल उर्फ मड्या फाटे याला हॉटेलबाहेर खेचत आणून सचिन उर्फ गोट्या सोमनाथ प्रधान (वय २९), अजय सोमनाथ प्रधान (वय २३), आतिष लक्ष्मण काळे (वय ३४), नामदेव प्रधान, दर्शन चौधरी व त्यांच्या तीन साथीदारांनी बेदम मारहाण करीत डोक्यात दगड घालून हत्या केली होती.
संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळातही हॉटेल सुरू ठेवणाऱ्या महेश भोंडवे यांचे हॉटेल पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर सील करण्यात आले आहे. तसेच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे जमादार हरिकराम वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून महेश भोंडवे यांच्याविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे


