Share

‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा

Published On: 

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटने त्यांचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या वक्तव्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. सरकारने लसींचा साठा आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) दिशानिर्देश लक्षात न घेता अनेक वयोगटांतील लोकांचे लसीकरण सुरू केल्याचे जाधव म्हणाले होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवले आहे.

त्यात म्हटले आहे की, जाधव यांचे वक्तव्य कंपनीची अधिकृत भूमिका नाही. मंत्रालयाचे नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांना सीरमच्या वतीने २२ मे रोजी पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, जाधव यांचे वक्तव्य वैयक्तिक आहे. हे कंपनीचे म्हणणे नाही. कंपनीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तसेच सीरमने एक पत्रकही काढले आहे. त्यात म्हटले आहे की, सीरम कोविशील्डच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी वचनबद्ध आहे.

काय म्हणाले होते सुरेश जाधव?
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लशीबाबतच्या स्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. केंद्र सरकारने लशीच्या साठ्याबाबत कोणतीही माहिती न घेता १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली. इतकेच नाही तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइन्सवर देखील केंद्र सरकारने विचार केला नाही, असे जाधव यांनी म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!