नांदेड : एका महिलेला सोशल मीडियावरील मैत्री चांगलीच भोवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मैत्रीचा फायदा घेऊन वाढदिवसानिमित्त अमेरिकेतून पार्सल पाठवल्याचे सांगून ते सोडवून घेण्याच्या नावाखाली ४ लाख २६ हजारांची फसवणूक झाली. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी अमेरिकेच्या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
किनवट तालुक्यातील उमराबाजार येथील चित्ररेखा हरिदास इंगळे या महिलेची अमेरिकेतील दोघांनी फेसबुकवरून मैत्री करून घेतली. या मैत्रिचा गैरफायदा घेऊन अमेरिका येथील एरिक एडवर्ट व दुसऱ्या एका महिलेने चित्ररेखा यांना वाढदिवानिमित्त अमेरिकेतून ५० हजार पाउंडचे पार्सल पाठवल्याचे सांगून ते सोडवण्यासाठी टॅक्स स्वरूपात चित्ररेखा यांनी सारखणी येथील एसबीआय बँकेतील ४ लाख २६ हजार रुपये १० ते १३ मे या कालावधीत वेळोवेळी आरोपीच्या खात्यावर टाकले.
आरोपीकडून वेळोवेळी पैशाची मागणी होत असल्याने आपली फसवणूक झाल्याची शंका आल्यानंतर चित्ररेखा इंगळे यांनी मांडवी पोलिसांकडे २२ रोजी तक्रार नोंदवली. यावरून पोलिसांनी अमेरिकेच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मल्हारी शिवरकर करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- मराठा आरक्षणाअभावी शिक्षणाची संधी हुकली; धुळ्यात विद्यार्थ्याची आत्महत्या
- ठरलं तर ! ‘या’ तारखेला होणार भव्य मराठा आरक्षण मोर्चा
- देवमाणूस : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देणार रतन टाटा आधार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

