Share

बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

कानपूर : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशभरात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वेगाने होणाऱ्या वाढीसह त्याचा धोकाही वाढलाय. अशावेळी अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्यात आले आहे.

एकीकडे देशात म्युकरमायकोसिसच्या (ब्लॅक फंगस) रुग्णांची संख्या वाढत असतानाच व्हाइट फंगस म्हणजेच पांढऱ्या बुरशीसंदर्भातही काही दिवसांपूर्वी इशारा देण्यात आला आहे. त्यातच आता यल्लो फंगसचाही पहिला रुग्ण उत्तर प्रदेशमधील गाझीयाबादमध्ये आढळून आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसपेक्षा अधिक यल्लो फंगसचा संसर्ग हा धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. यल्लो फंगसच्या या पहिल्या रुग्णावर शहरातील कान नाक घसा तज्ज्ञ असणाऱ्या ब्रिज पाल त्यागी यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याचे डीएनए या इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या आपल्या बातमीत म्हटले आहे.

यल्लो फंगसच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सुस्ती येणे, भूक न लागणे किंवा वजन कमी होणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये जखमांमधून पू बाहेर येणे आणि जखमा भरण्यासाठी गरजेपेक्षा अधिक वेळ लागण्याच्या समस्या उद्भवतात. कधीकधी अवयव निकामी होणे, डोळ्यांचा आकार कमी होणे, डोळे कोरडे पडणे अशी लक्षणंही दिसून येतात.

यल्लो फंगसची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे याचा संसर्ग झाल्याचे तातडीने कळत नाही. शरीराअंतर्गत याचा संसर्ग झाल्यानंतर हळूहळू लक्षणे दिसू लागतात. त्यामुळेच काहीही लक्षणे दिसली तरी तातडीने औषधोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर दिला आहे. सध्या यल्लो फंगसवर अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन हा एकमेव इलाज आहे. हे इंजेक्शन बुरशीसदृश्य आजारांवर दिले जाते.

दरम्यान, या रुग्णांना एम्फोटेरीसीन-बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन-बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. याचाच अर्थ या इंजेक्शनचा कमतरता जाणवत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!