Share

‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : नांदेड येथे एक खळबळजनक प्रकार घडला होता. ‘दहा कोटी रुपये द्या, नाही तर नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय व अन्य शासकीय कार्यालये बॉम्बने उडवून टाकू,’ अशा धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर ८ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एक मेल आला. त्यामध्ये शासकीय कार्यालयांसह संपूर्ण नांदेड शहर बॉम्बने उडवून टाकीन, असा संदेश लिहिलेला होता. जिल्ह्यातील १२५ जागी हॉटस्पॉट निवडले असून बॉम्ब फुटायला तयार आहेत, अशी धमकी होती. सोबतच त्याने सर्व कार्यालयांची यादी जोडली होती.

घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांकडून गुप्तता बाळगण्यात आली. पण, यावर तपासणी सुरू होती. तांत्रिक मदतीने हा मेल पाठवणाऱ्याची माहिती काढण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी याप्रकरणी विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत संपर्क साधून हा मेल पाठवणाऱ्याची माहिती मिळवली. आरोपी शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ (३५, रा.आगापुरा, अर्धापूर, जि.नांदेड) यास रविवारी अटक केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!