Share

‘शाब्बास मुंबईकर’ असं म्हणण्याची वेळ लवकरच येईल; किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केला विश्वास

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने हाहाकार केला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एप्रिलच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची भर पडत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर सारख्या औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.

दरम्यान, यानंतर राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला असून आता याचा काहीसा परिणाम रुग्णवाढीच्या संख्येवर झाला आहे. रुग्णसंख्या कमी होत असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याचे श्रेय मुंबईकरांना दिलं आहे.

‘मुंबईत ४ एप्रिल रोजी ११,१६३ रुग्ण सापडले होते. आताचे चित्र पाहिल्यास २५ एप्रिलची आकडेवारी ५,५४२ रुग्ण इतकी आहे. मुंबईकर कोरोना नियमांचं पालन करताहेत. संयम दाखवाताहेत, याचा हा परिणाम आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात, कोरोनाचा प्रादूर्भाव पूर्णपणे थांबलेला नसला तरी आकडा वाढू नये यासाठी मुंबईकर कटिबद्ध असल्याचं दिसत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.

यासोबतच, ‘मुंबईत लॉकडाऊन सुरू आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळं बहुतांश मुंबईकर घरात बसत असल्याचं चित्र दिसतंय. हे चित्र कायम राहिल्यास ‘शाब्बास मुंबईकर’ असं म्हणण्याची वेळ लवकरच येईल, असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!