Share

…म्हणून ‘त्या’ रात्री अनिल देशमुखांच्या घरी अचानक सीबीआयचे अधिकारी पुन्हा आले

Published On: 

नागपूर : १०० कोटींच्या खंडणीचा आरोप मुंबईचे माजी आयुक्त परमबीरसिंह यांनी केल्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने (CBI) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

२४ एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या नागपूर येथील निवासस्थानात जवळपास दहा तासांहुन अधिक वेळ झाडाझडतीनंतर सीबीआयचे अधिकारी बाहेर पडले होते. यावेळी त्यांनी महत्वाच्या कागदपत्रांसह लॅपटॉप, प्रिंटर सारखे इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील ताब्यात घेतले होते. यावेळी अनिल देशमुख यांची देखील कसून चौकशी करण्यात आली.

सीबीआयची टीम घरातून बाहेर पडल्यानंतर अनिल देशमुख देखील आपल्या काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, काही वेळाने सीबीआयची टीम पुन्हा एकदा अनिल देशमुखांच्या घरी परतली. यामुळे अनिल देशमुख देखील आपला दौरातत्काळ घरी दाखल झाले.

दरम्यान, दुसऱ्यांदा सीबीआयची टीम देशमुखांच्या घरी दाखल झाल्यामुळे त्यांच्यावर काही कडक कारवाई केली जाईल का ? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. देशमुखांच्या समर्थकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, देशमुखांच्या घरात आणखी काही जुने संगणक, लॅपटॅाप होते. त्याची आठवण सीबीआयच्या अधिकाऱ्यांना झाली, त्याचमुळे पुन्हा पाच अधिकारी एका वाहनात आले. यावेळी त्यांनी ते संगणक, लॅपटॅापची तपासणी केली. त्यांच्या हार्डडिक्स आणि अन्य काही पार्ट ताब्यात घेतले व ९ च्या सुमारास हे पथक निघून गेले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!