Share

रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या तिघांची हर्सुल कारागृहात रवानगी

Published On: 

औरंंगाबाद : रिक्षाचालक तरुणाच्या हत्येप्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केलेल्या आसेफ मुसा शेख, शेख जब्बार शेख सत्तार आणि रईस मुसा शेख या तिघांची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी शुक्रवारी (दि.४) दिले.

शेख वसीम शेख फरीद उर्फ शाहरुख (वय २६, रा. इंदिरानगर, न्यू बायजीपुरा) याची शनिवारी मध्यरात्री नारेगाव परिसरातील दर्गा मस्जिदीसमोरील रस्त्यावर आर्थिक वादातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मृताचा रिक्षाचालक भाऊ शेख नफिस शेख फरीद याने तक्रार दिली आहे.

त्यावरून वरील तिघा आरोपींना रविवारी अटक करण्यात आली. आरोपींकडून मृताच्या अंगावरील बूट, हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र, गुन्ह्याचा उद्देश, गुनह्यात आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने त्यांना ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवणयाचे आदेश दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!