औरंंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरातील कुख्यात गुन्हेगार तथा स्वयंघोषीत डॉन विशाल उर्फ मड्या किशोर फाटे याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती. अटकेत असलेल्या अजय सोमनाथ प्रधान (वय २३), सचिन उर्फ गोट्या सोमनाथ प्रधान (वय २९) आणि आतिष लक्ष्मण काळे (वय ३४, सर्व रा. निरंकार नगर, साजापूर रोड, वडगांत कोल्हाटी) या तिघांनी विशाल उर्फ मड्याची हत्या पूर्ववैमनस्यातून केली असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली. दरम्यान, अटकेत असलेल्या तिघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे.पाटील यांनी दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विशाल उर्फ मड्या किशोर फाटे (वय २६, रा.वडगांव कोल्हाटी) हा हैदराबाद येथील विम्टा क्लिनीक्स या खासगी कंपनीत नोकरीला होता. तो नुकताच १९ मे रोजी सुटीवर आला होता. त्यावेळी त्याने आपला भाऊ अभिजीत फाटे याला सांगितले होते, जुन्या भांडणाच्या कारणावरून अजय प्रधान, नामदेव प्रधान, सचिन उर्पâ गोट्या प्रधान, आतीश काळे हे जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.
त्यामुळे वाढदिवस झाल्यानंतर तो पुन्हा हैदराबादला जाणार होता. शुक्रवारी सकाळी तो साडेनऊच्या सुमारास सलूनमध्ये जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री सव्वादहाच्या सुमारास हॉटेल जयभवानीसमोर अजय प्रधान, नामदेव प्रधान, सचिन उर्पâ गोट्या प्रधान, आतीश काळे हे साथीदारासह विशाल उर्फ मड्याला मारहाण करीत होते. त्यावेळी अभिजित फाटे याने हॉटेल जयभवानीकडे धाव घेतली, त्यावेळी अजय प्रधानने अभिजीत समोरच विशाल उर्पâ मड्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

