Share

नारेगाव परिसरातील ‘त्या’ प्रकरणात तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी

Published On: 

औरंंगाबाद : रिक्षाचालक तरुणाच्या हत्येप्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी शेख जब्बार शेख सत्तार (वय २७), आसेफ मुसा शेख (वय २६) व रईस मुसा शेख (वय २८, रा. तिघेही बिस्मिल्ला कॉलनी, नारेगाव) या तिघांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या तिघांना ४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. ए. एस. कांबळे यांनी दिले आहेत.

शेख वसीम शेख फरीद उर्फ शाहरुख (वय २६, रा. सिकंदर हॉल गल्ली, इंदिरानगर, न्यू बायजीपुरा) या रिक्षाचालकाची शनिवारी मध्यरात्री नारेगाव परिसरातील दर्गा मस्जिदीसमोरील रस्त्यावर आर्थिक वादातून चाकूने भोसकुन हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणी मृताचा रिक्षाचालक भाऊ शेख नफिस शेख फरीद याने दिलेल्या तक्रारीवरून शेख जब्बार शेख सत्तार, आसेफ मुसा शेख व रईस मुसा शेख यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर एमआयडीसी सिडको पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिघांना गजाआड केले. अटकेत असलेल्या तिघांनाही न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवणयाचे आदेश दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!