दिल्ली : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरी लाट ही अत्यंत भयंकर असल्याचे कोरोना रुग्णांच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. या लाटेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढत असून अनेकांना आपले प्रियजन गमवावे लागत आहेत.
बाहेरील देशांकडून आता मदत येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या उपाययोजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण करत कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, देशात आता तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वर्तवली जात आहे.
दरम्यान, केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी बुधवारी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच तिसरी लाट नक्की येणार असा दावाही त्यांनी केला आहे. विजय राघवन यांनी म्हटलं की, ‘कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या बऱ्यास केसेस समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती येणार हे नक्की आहे. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे.’ ते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘निवडणुका घेता, आयपीएल खेळवता; मग परीक्षाही घ्या’, ओबीसी क्रांती मोर्चाची मागणी
- ‘श्रीमंत थकबाकीदारांकडून तत्काळ शेती कर्ज वसूल करा’, आ.श्वेता महालेंची मागणी
- अनवाणी धावून पतीला वाचवलं, पण अखेर कोरोनाने हिरावलं !
- पुन्हा उसळणार ! उद्या मराठा क्रांती मोर्चाची महत्वाची बैठक…
- महसूल विभागाचा जावईशोध! म्हणे, पैठणचा हिरडपुरी बांध हा बीड जिल्ह्याच्या हद्दीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

