Share

अनवाणी धावून पतीला वाचवलं, पण अखेर कोरोनाने हिरावलं !

Published On: 

पुणे : गेल्यावर्षी पासून देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत भयंकर असल्याचे कोरोना रुग्णांच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. या लाटेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढत असून अनेकांना आपले प्रियजन गमवावे लागत आहेत.

पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावणाऱ्या बारामतीच्या लता करे यांच्या पतीचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. पतीच्या उपचारासाठी चक्क वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. एवढंच नाही तर सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली होती. आता त्या ७२ वर्षांच्या असून त्यांचे पती भगवान करे यांचे आज निधन झाले आहे.

दरम्यान, लता करे यांच्या संघर्षातून प्रेरित होऊन ‘लता भगवान करे,एक संघर्षकथा’ असा एक चित्रपट देखील काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे करे यांनीच त्यांची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली होती. दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपटास ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मध्ये जाहीर झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!