Share

‘श्रीमंत थकबाकीदारांकडून तत्काळ शेती कर्ज वसूल करा’, आ.श्वेता महालेंची मागणी

Published On: 

बुलडाणा : मागील पाच वर्षापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. परंतु या कर्जमाफीचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. यांचे प्रमुख कारण म्हणजे गावागावातील बंद पडलेल्या विविध कार्यकारी सोसायट्या पुनर्जीवित केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी कोट्यावधी रुपये कर्ज थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदाराकडून तत्काळ वसूल करण्याची मागणी चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी जिल्ह्याच्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत केली.

बुलडाणा जिल्ह्याची खरीप हंगाम आढावा बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या बैठकीत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी इत्यादींची उपस्थिती होती. चिखली विधानसभा मतदार संघातील जिल्हा बँकेच्या थकबाकी दाराकडे पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे जिल्हा बँक अडचणीत आली असून विविध कार्यकारी संस्था बंद पडल्या. पूर्वी प्रत्येक गावात विविध कार्यकारी सोसायट्या होत्या. सोसायट्या मार्फत सहा ते सात दिवसात संपूर्ण गावकऱ्यांना कर्जाचे वाटप होत असे.

परंतु काही थकबाकीदारांकडून वसुली होत नसल्याने जिल्हा बँक अडचणीत आली. परिणामी लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ही परिस्थिती बदलायची असेल तर तत्काळ श्रीमंत थकबाकीदारांकडून कर्जाची वसुली करण्यात यावी, मागणी आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत बड्या थकबाकीदाराकडून तत्काळ कर्ज वसूल करण्यासाठी प्रयत्न करा. थकबाकीदारांमुळे लाखो शेतकरी अडचणीत येत असतील तर ही बाब योग्य नाही अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!