Share

‘निवडणुका घेता, आयपीएल खेळवता; मग परीक्षाही घ्या’, ओबीसी क्रांती मोर्चाची मागणी

Published On: 

भंडारा : राज्यातील कोरोनामुळे शालेय शिक्षण मंत्रालयाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यावर ओबीसी क्रांती मोर्चाने आक्षेप घेतला आहे. राज्यात निवडणुका चालते, आयपीएलच्या क्रिकेट मॅचेस चालतात, मग परीक्षा का चालत नाही, असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. निवडणुका, आयपीएल प्रमाणेच दहावीच्या परीक्षाही घ्या, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाने केली आहे.

कोरोनामुळे सरकारने मागील परीक्षा न घेता प्रमाणपत्र दिले. आता सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएससी), महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यासह देशातील इतर राज्यातीलही परीक्षा मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, दहावी ते पदवीधर शिक्षणापर्यंतच्या गुणपत्रिका यांचा विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अहवालात केला जातो. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात दहावीची परीक्षा रद्द केल्याने विपरीत परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने पदवी परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय दिला आहे. तोच निर्णय विविध मंडळांनी मान्य करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे दहावीची परीक्षा घेणे अपेक्षित आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर येत्या मे, जून किंवा जुलै महिन्यात परीक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी इयत्ता दहावीची परीक्षा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!