मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहे.
यासंदर्भात बीडमध्ये उद्या (६ मे ) मराठा आरक्षण रणनीती संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि मराठा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. कोविडमुळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून या बैठकीत काय निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
आरक्षण लढ्याच्या संदर्भात पुढची रणनीती आणि दिशा या बैठकीमध्ये ठरवली जाणार असून जिल्हा स्तरावरील या बैठकीनंतर राज्यभर बैठक घेणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले आहे. उद्या (६ मे ) सकाळी 11 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलं असून बैठकीला मराठा समाजातील सर्व संघटना आणि महत्वाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण निकाल हा महाविकास आघाडीच्या दुर्लक्षाचा परिणाम-रावसाहेब दानवे यांचा आरोप
- कोरोना रोखण्यासाठी राज्यातील दीड हजार माजी आमदार देणार एका महिन्याचे वेतन
- ‘सुप्रीम कोर्टाने मूठभर श्रीमंत व पुढारलेल्या मराठ्यांना समोर ठेवून निकाल दिला’
- ‘शिक्षण सम्राटांच्या फायद्याचा विचार सोडून, सरकारने आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा द्यावा’
- सिटी चौक ते किलेअर्क रस्ता घेणार मोकळा श्वास! मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

