नागपूर : महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा सुरू करण्यात आला आहे. पण, आता ज्याची भिती व्यक्त केली जात होती, ती कोरोनाची तिसरी लाट नागपूरमध्ये पाऊल टाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नागपूरमध्ये पुन्हा विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी संख्येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या डबल अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी राऊत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी आणि डॉक्टरांना सूचनाही केल्या. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधतान लॉकडाऊन लावण्याचे सूतोवाच केलं.
दरम्यान आता नागपूरमध्ये पुन्हा तीन दिवसानंतर निर्बंध कडक करण्यात येणार आहे. नवीन निर्बंधानुसार, हॉटेल हे 8 वाजेपर्यंत सुरू असेल तर दुकानं 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. सोबतच परत एकदा विकेंडला बाजरापेठेसाठी लॉकडाऊन सुरू करण्यात येणार आहे. सर्व संघटना सोबत चर्चा करून तीन दिवसांनंतर हे नियम लागू करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नारायण राणेंच्या ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केला ‘हा’ गंभीर आरोप
- ‘आता मी कोणासाठी जगणार…’; सिद्धार्थच्या आईने व्यक्त केल्या वेदना
- बिंदूसरासह माजलगाव धरण शंभर टक्के भरले, ११ दरवाजे उघडले
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

