Share

खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला

Published On: 

खेड – पुण्यात तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झालेत. खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेली हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. एक तरुण वेळीच मदतीला धावल्याने वृद्ध सुदैवाने बचावले आहेत. सैरावैरा धावणाऱ्या तरासाची अज्ञात वाहनाला धडक लागली आणि त्यात या तरसाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध रस्त्यावरून पायी निघालेले दिसतायेत. तेंव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर आला. पुढे पायी निघालेल्या वृध्दाचा हात त्याने अक्षरशः जबड्यात धरला. गावातील तरुण हातात काठ्या घेऊन याच तरसाच्या शोधात होते. सुदैवाने एक तरुण तिथंच तरसाचा शोध घेत होता. त्या तरुणाने तरसाला हुसकावून लावण्यासाठी काठीने प्रहार केला. काही वेळाने तरस धावला पण त्याने वृद्धाला गंभीर जखमी केले होते.

तिथे असणाऱ्या एकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात हा सर्व थरार कैद झाला. तसेच या तरसाने दुचाकीवरील आणखी एका व्यक्तीला चावा घेतला. नंतर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाच्या तोंडाला जबर मार लागला आणि जखमी अवस्थेतील तरसाचा नंतर मृत्यू झाला. अशी माहिती खेड वनविभागाने दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!