Share

नारायण राणेंच्या ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कारचालकाच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केले आहेत. कारचालक वैद्यकीय सुट्टीवर असतानाही त्यांना कामावर बोलवण्यात आल्याचा दावा कारचालकाच्या कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी आता याबाबत चौकशीला सुरवात केली आहे. नारायण राणे हे लखनऊ दौऱ्यावर असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.

अशोक कुमार वर्मा असं या कारचालकाचं नाव होतं. ते राज्य स्थावर विभागत चालक या पदावर कार्यरत होते. त्यांची प्रकृती ठिक नव्हती. मात्र नारायण राणे हे लखनऊ दौऱ्यावर असताना त्यांना कामावर बोलवण्यात आलं. कामावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.

अशोक कुमार यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते वैद्यकीय रजेवर होते. पण राणे लखनऊमध्ये आल्यानंतर त्यांची रजा रद्द करण्यात आली. त्यांना जबरदस्तीने कामावर बोलवण्यात आलं. स्थावर विभागातील अधिकारी अमरिश श्रीवास्तव यांना अशोक कुमार यांच्या प्रकृतीबाबतची कल्पना होती. त्यानंतरही त्यांनी निलंबित करण्याची धमकी दिली होती. म्हणून अशोक कुमार यांना कामावर हजर व्हावं लागलं, असा गंभीर आरोप अशोक कुमार यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!