Share

‘आता मी कोणासाठी जगणार…’; सिद्धार्थच्या आईने व्यक्त केल्या वेदना

Published On: 

इंग्लंड : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर मित्रपरिवार सिद्धार्थच्या आईला भेटायला गेले होते. त्यापैकी एक राहुल वैद्य देखील होता. राहुलने सिद्धार्थच्या आईची भेट घेतल्यानंतर एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या आईची स्थिती सांगितली आहे. राहुलने सांगितले की मुलाच्या अचानक जाण्याने त्याची आई अजूनही धक्क्यात आहे, तरी त्यांनी स्वतःला मजबूत ठेवले आहे.

व्हिडिओमध्ये राहुल सांगत आहे की, जेव्हा त्याला सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा त्याचा त्यावर विश्वास बसत नव्हता. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जेव्हा एका प्रकाशनाचा राहुल फोन आला. तेव्हा त्याला विचारले, तू सिद्धार्थचा मित्र आहेस का? आम्ही ऐकले की त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यावर राहुलला धक्का बसला. राहुल सांगतो की जेव्हा त्याने पहिल्यांदा ही बातमी ऐकली तेव्हा त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. मग सिद्धार्थने आपल्याला सोडल्याच्या बातम्याने त्याला या गोष्टीचा विश्वास बसला.

राहुलने सांगितले की तो आणि दिशा सिद्धार्थच्या आईला भेटायला गेले. तेव्हा त्याला आत जायला देखील भीती वाटत होती. पण राहुलने एकत्र असेही सांगितले की त्याची आई खूप मजबूत आहे. सिद्धार्थच्या आईने सांगितले ते ऐकून आम्ही स्तब्ध झालो. त्या म्हणाल्या, कोणाचा तरुण मुलगा गेला आहे, कोणाचा तरुण मुलगा मरण पावला आहे. हे ऐकले होते पण आपल्यासोबत असे होईल असे कधी वाटले नव्हते. आता मी कोणासाठी जगणार, मी माझे सर्वस्व गमावले आहे.’

सहनाज अजूनही धक्क्यात 

राहुल म्हणाला, मी सिद्धार्थच्या कुटुंबियांना आणि शहनाज यांना शक्ती देण्याची देवाकडे प्रार्थना करतो. मी त्या दिवशी गेलो होतो, तेव्हा शहनाज बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!