मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, आता सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते टीका करू लागले आहेत तर भाजपनेते या कारवाईचे स्वागत करताना दिसून येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या कारवाई वर शंका उपस्थित केली आहे. ‘कुछ तो गडबड है… मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते. अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय.आर वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया..कुछ तो गडबड जरूर है’. असं ट्विट करत सीबीआय कारवाईर शंका उपस्थित केली आहे.
कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा आहे. १०० कोटींच्या घपल्याचा खरा सूत्रधार जनतेसमोर येईलच थोडी कळ काढा. https://t.co/rcF7bbGs6b
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 24, 2021
राऊतांच्या या शंकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा आहे. १०० कोटींच्या घपल्याचा खरा सूत्रधार जनतेसमोर येईलच थोडी कळ काढा.’ असा प्रहार भातखळकर यांनी केला आहे. तसेच, ‘हायकोर्टाने अनिल देशमुख प्रकरणात दिलेल्या निकालात मुद्दा क्रमांक ८४ मध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की प्राथमिक चौकशी नंतर योग्य ती कारवाई करण्याचे CBI ला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ‘ असं संजय राऊत यांच्या लक्षात आणून दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील ऑक्सिजन संकट निवारण्यासाठी हवाई दल इन ऍक्शन; सिंगापूरहून आणणार मदत
- ‘दया… कुछ तो गडबड जरूर है’, सीबीआयच्या कारवाईवरून राऊतांचा प्रहार
- सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे केंद्राची पाठराखण, काँग्रेसचा आरोप
- ‘तुमच्या अनेक चुका आहेत…’ कंगना रनौतने केजरीवाल यांना सुनावले
- पाच स्पर्धेतील अपयशाचे ओझे घेऊन जगणाऱ्या सचिनचे विश्वचषकाचे स्वप्न २०११ मध्ये झाले पु्र्ण


