Share

‘दया… कुछ तो गडबड जरूर है’, सीबीआयच्या कारवाईवरून राऊतांचा प्रहार

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.खंडणी प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्या मालमात्तांवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील 10 ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सीबीआयने याप्रकरणी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आता सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते टीका करू लागले आहेत तर भाजपनेते या कारवाईचे स्वागत करताना दिसून येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या कारवाई वर शंका उपस्थित केली आहे. ‘कुछ तो गडबड है… मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते. अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय.आर वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया..कुछ तो गडबड जरूर है’. अस ट्विट करत सीबीआय कारवाईर शंका उपस्थित केली आहे.

दरम्यान, दुसरीकडे देशमुख यांच्यावर झालेली कारवाई हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस, परमबीरसिंग दिल्लीत गेले. पहाटे अमित शहांची भेट घेतली आणि एनआयएकडे हा तपास गेला. पुराव्यांशिवाय अशी चौकशी होऊ शकते का? सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय अशी चौकशी करणं म्हणजे भाजपानं विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी केलेलं कट-कारस्थान आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईल आणि अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!