Share

सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे केंद्राची पाठराखण, काँग्रेसचा आरोप

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संदर्भात उच्च न्यायालयांमध्ये सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याची टीका काँग्रेसने केली. सर्वोच्च न्यायालयाच्या अशा हस्तक्षेपामुळे या महामारीचा सामना करण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारची पाठराखण केली जाते, असा आरोपही काँग्रेसने केला.

काँग्रेस प्रवक्ते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोना महामारीचा उद्रेक झालेला असताना सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारे हस्तक्षेप करायला नको होता, अशी भूमिका मांडली. आज देशाला केंद्रीकरणाची नव्हे तर विकेंद्रीकरणाची गरज आहे. नागरिकांच्या जगण्याचा अधिकारांचे रक्षण करण्यास आणि सरकारला त्यांच्या कर्तव्यासाठी जबाबदार धरण्यास उच्च न्यायालये सक्षम आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून कोरोना परिस्थिती दखल घेऊन सुनावणी घेण्याची गरज नव्हती. हे उच्च न्यायालयांच्या आदेशांच्या विरोधात उचलले पाऊल असून हे पूर्णत: चुकीचे आहे, असे सिंघवी म्हणाले.

दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजनच्या मुद्यावरून रात्री नऊ वाजता सुनावणी घेऊन जे केले ते सर्वोच्च न्यायालयाने केले नाही. स्थानिक प्रश्न, सोयी-सुविधांचा मुद्दा निकाली काढण्यास सर्वोच्च न्यायालय सक्षम नाही. त्यामुळे कोर्टाने हस्तक्षेप करण्याची गरजच नाही, असा आक्षेप सिंघवी यांनी केला. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे कोरोना संकटात सपशेल अपयशी ठरलेल्या केंद्राची पाठराखण केल्यासारखे होत असल्याचा आरोपही केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!