नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा देशात निर्माण झाला असून सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला फटकारले आहे. तर, विरोधकांनी देखील हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारतर्फे परदेशातून ऑक्सिजनबाबत मदत मागवण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी IAF म्हणजेच भारतीय हवाई दलाने मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. देशाला ऑक्सिजन संकटातून बाहेर काढण्यासाठी हवाई दलाच्या विमानांमधून विविध देशातून मदत आणली जात आहे. IAF च्या विमानाने ऑक्सिजनचे मोकळे टॅन्कर आणि कन्टेनर घेऊन सिंगापूरकडे उड्डाण केलं आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन भरून हवाई दलाचे हे विमान संध्याकाळपर्यंत भारतात परत येणार आहे.
IAF's C-17 aircraft arrived at Singapore's Changi International Airport today to load 4 containers of cryogenic oxygen tanks. The aircraft will offload these containers at Panagarh airbase by today evening. pic.twitter.com/kzOHOpKCkW
— ANI (@ANI) April 24, 2021
देशात साडेतीन लाखांच्या आसपास रुग्णांची भर पडत असल्याने ऑक्सिजनचा मोठा शव्द निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी हवाई दलाने कंबर कसली आहे. हवाई दलाचे C-17 हे विमान क्रायोजेनिक ऑक्सिजन टॅंकचे चार कंटेनर घेऊन सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचलं आहे. हे विमान या ठिकाणी ऑक्सिजन भरेल आणि संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगालच्या पनागर एअरबेसवर उतरेल, अशी माहिती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवाई दलाच्या पुढाकाराने ऑक्सिजन देशभरात विविध फिलिंग स्टेशनवर पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या महामारीच्या काळात आपण सगळे सोबत आहोत’ ; शोएब अख्तरने भारतीयांसाठी मागितली अल्लाहकडे दुवा
- ‘दया… कुछ तो गडबड जरूर है’, सीबीआयच्या कारवाईवरून राऊतांचा प्रहार
- सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे केंद्राची पाठराखण, काँग्रेसचा आरोप
- ‘तुमच्या अनेक चुका आहेत…’ कंगना रनौतने केजरीवाल यांना सुनावले
- पाच स्पर्धेतील अपयशाचे ओझे घेऊन जगणाऱ्या सचिनचे विश्वचषकाचे स्वप्न २०११ मध्ये झाले पु्र्ण


