मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज संवाद साधला. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींकडे ऑक्सिनजचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगत मदतची मागणी केली. पण मोदी आणि केजरीवाल यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण होत असल्याने मोदी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
ऑनलाईन बैठकीत कोरोनासंबंधी राष्ट्रीय योजना असेल तर केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारं त्यादृष्टीने काम करतील असे अरविंद केजरीवाल सांगत होते. या बैठकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूतील मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.
केजरीवाल आपले म्हणणं मांडत असतानाच पंतप्रधानमोदी यांनी त्यांना रोखलं आणि फटकारलं. मोदी म्हणाले की, ‘मुख्यमंत्री अशा अंतर्गत बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण करणं आपली परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. हे योग्य नाही. आपल्याला नेहमी याचं पालन केलं पाहिजे’.
यानंतर केजरीवाल यांनी हात जोडून पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती. पण आता या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौतने केजरीवाल यांना सोशल मीडियाद्वारे सुनावले आहे.
या बैठकीचा व्हिडीओ बीजेपी महिला मोर्चाच्या प्रीती गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. प्रीती गांधी यांचा हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिले आहे की, तुमच्या अनेक चुका आहेत… 1. स्वतःच्या प्रमोशनमध्ये राज्याचा पैसा वाया घालवणे. 2. वेगवेगळे प्रमोशन आणि दंगलीत राज्याच्या पैशांचा अपव्यय 3. नि: शुल्क वीज आणि पाणी देत मतदारांना थोड्या वेळासाठी संतुष्ट करणे, दीर्घ काळासाठी काही योजना/पायाभूत सुविधा नाही, देशाच्या राजधानीत एकही ऑक्सिजन प्लांट नाही. अशाप्रकारे कंगनाने केजरीवाल यांना सुनावले आहे.
Your galti are many but to begin with
1) Spending state money in self promotion
2) wasting money in plotting and sustaining various protests/riots
3) instant gratification to voters by free bijli paani no long terms plans/infrastructure,not a single oxygen plant in the capital https://t.co/WKXPulvs9P— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 23, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘अशा’ धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे – जयंत पाटील
- आज रंगणार केकेआरविरुद्ध आरआरमध्ये सामना ; दोन्ही संघांची आहे एकसारखीच स्थिती
- ‘संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी’
- ‘कमी स्कोअरची खेळपट्टी आयपीएलची मजा घालवू शकते…’ ; स्टोक्सने व्यक्त केली नाराजी
- ‘रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या’; भरत जाधव यांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

