Share

पाच स्पर्धेतील अपयशाचे ओझे घेऊन जगणाऱ्या सचिनचे विश्वचषकाचे स्वप्न २०११ मध्ये झाले पु्र्ण

Published On: 

मुंबई : १९८३ साली भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा सचिन केवळ १० वर्षाचा होता. त्या विश्वविजयानंतर अनेकांनी आपनही एक दिवस भारताला विश्वचषक जिंकुन देऊ. सचिनही त्यापैकीच एक होता. आज सचिनचा वाढदिवस त्यानिमीत्त खास त्याचा हा विश्वचषकाचा प्रवास. सचिनच्या क्रिकेट वेडाने त्याला १९८३ नंतर भारतात झालेल्या पुढच्या विश्वचषकात सचिन मैदानावर बॉल बॉयची भूमिका पार पाडत होता. यानंतर झालेल्या १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर सचिनने या स्पर्धेत २८३ धावा केल्या. या स्पर्धेत भारतीय संघाने केवळ दोन सामन्यात विजय मिळवला. या दोनही सामन्यात सामनावीर होता सचिन तेंडुलकर त्यात पाकिस्तान विरुद्धची त्याची खेळी आजही क्रिकेटरसीकांच्या मनात ताजी आहे.

https://www.youtube.com/watch?v=scm-zaC2aE0

यानंतर १९९६ ची विश्वचषक स्पर्धा यावेळी सचिन भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू बनला होता. या विश्वचषकात सचिनने सर्वाधिक ५२३ धावा केल्या होत्या. तसेच विश्वचषकात पाचशे धावांचा टप्पा ओलांडणारा तो एकमेव खेळाडू होता. तर भारतीय संघ विजयी झालेल्या चार सामन्यापैकी २ सामन्यात सचिन सामनावीर होता. यांनतर १९९९चा विश्वचषक सचिनच्या चाहत्यासाठी विशेष होता. या विश्वचषकादरम्यान सचिनच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच्या अतिंम विधीसाठी तो स्पर्धा अर्ध्यावर सोडुन १९ मे रोजी मायदेशी परतला. अतिंम विधीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याने आपले दु:ख बाजुला सारुन पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. आणि २३ मे रोजी केनीया विरुद्ध १४० धावांची नाबाद खेळी करुन आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. शतक झाल्यानंतर तो नेहमी आकाशाकडे बघत वडिलांना अभिवादन करत होता.

यानंतर झालेल्या २००३ विश्वचषक स्पर्धेत भारताने धडाकेबाज कामगीरी करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्यात भाराताचा ऑस्ट्रेलियाकडुन दारुण पराभव झाला. या स्पर्धेत सचिनने ६ अर्धशतक आणि १ शतकासह ६७३ धावा केल्या. पुढील विश्वचषकात मात्र भारताला साखळी सामन्यातुनच बाहेर पडावे लागले. यांनतर २०११ च्या विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. कारण हा विश्वचषक सचिनचा आखेरचा विश्वचषक ठरणार होता. हा विश्वचषक जिंकुन त्याचे स्वप्न पुर्ण होणार का याकडे संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले होते. या स्पर्धेत सचिनने २ शतकासह ४८२ धावा केल्या होत्या. सेमी फायनल सामन्यात सचिनने केलेली ८५ धावांची खेळी कुणीच विसरु शकणार नाही. अंतिम सचिन जरी अपयशी ठरला असेल मात्र ज्या खेळाडूंनी या सामन्यात विजयी खेळी केली ते खेळाडू सचिनलाच पाहुन मोठे झाले. आणि विश्वचषक जिंकल्यानंतर संघाने हा चषक सचिनला समर्पीत केला. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सचिनला खांद्यवर घेउन जी मानवंदना दिली होती ती आजही क्रिकेटरसीकांच्या मनात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!