Share

‘त्या’ १२ जागांचा वाद पुन्हा पेटणार, ठाकरे सरकारने केली पंतप्रधानांकडे राज्यपालांची तक्रार

Published On: 

नवी दिल्ली : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार राजकारण सुरु आहे. नुकतीच या प्रकरणात एका माहिती अधिकारातून एक नवीनच माहिती समोर आली होती. सोमेश कोलगे यांनी माहिती अधिकाऱ्यातून याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर प्रस्तुत प्रकरण विचाराधीन असल्यामुळे सध्य:स्थितीत माहिती उपलब्ध करुन देणे शक्य नसल्याचं उत्तर देण्यात आलंय.

त्यानंतर आता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांनी राज्यातील विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे.

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त असलेल्या बारा जागांचा रितसर ठराव केला आहे. यासाठी राज्यपाल कोश्यारी यांची भेटही घेतली आहे. पण अद्याप राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या 12 जागांवरील लवकरात लवकर नियुक्ती व्हावी, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे राज्यातील ठाकरे सरकारनं केली आहे. राज्य सरकारनं मोदी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!