Share

‘मंत्रालय ते चंद्रपुर मद्यधुंद करण्याचा निर्णय या ठाकरे सरकारने घेतलाय’; भाजपचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.

या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे. आधीच चंद्रपुरातील दारू बंदी उठवल्याने महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता या प्रकरणामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

या गंभीर प्रकरणावर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्रातील राज्य सरकारच मदिराप्रेम जगजाहिर आहे. या सरकारने मंदिर बंद ठेवली पण मदीरालयांना परवानगी दिली. चंद्रपुरची दारूबंदी उठवून मार्गही स्पष्ट केला. आता जिथे सामान्यांच्या प्रश्नाना न्याय मिळतो त्या मंत्रालयातच दारूचा बाटल्याचा खच सापडावा हे दुदैवी आहे,’ अशा शब्दांत केशव उपाध्ये यांनी संताप व्यक्त केला आहे.

यासोबतच, ‘विकासाच, जनहिताच सांगण्यासारख काहीच या सरकारकडे नसल्यामुळे मंत्रालय ते चंद्रपुर मद्यधुंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे का?’ असा सवाल करत उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!