Share

‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Published On: 

मुंबई : ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तसेच ज्यांनी लस घेवून १५ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना हा प्रवास करता येणार आहे. यासाठी एक ऍप देखील असणार आहे त्यावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात देखील हा पास मिळणार आहे.

मुंबई लोकल दोन डोस घेतलेल्या सामान्य मुंबईकरांसाठी तरी किमान सुरु करावी यासाठी मनसेसह भाजपने देखील जोरदार मागणी केली होती. यासाठी आंदोलन देखील करण्यात आले. दरम्यान, आता परवानगी दिल्यानंतर देखील भाजपने महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल सुरु ठेवला आहे. दोन डोस घेतलेले मुंबईकर लोकलने प्रवास करतील मात्र दोन डोस घेतलेले मंत्रालयात जाणार का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

https://twitter.com/keshavupadhye/status/1424970024800821253?s=20

‘दोन डोस झालेला सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करेल पण दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का? गर्दी टाळण्यासाठी तसही तुम्ही स्वत:च मर्सिडीझ चालवत असल्याने बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाही. दोन डोस झालेल्यांना जे नियम, ते स्वत:ही अमलात आणणार की अजूनही वर्क फ्रॉम होम ?’ असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!