औरंगाबाद : यंदा वेळेवर मान्सुनचे आगमन होणार असल्याचे हवामान खात्याने सांगतिले असल्याने कधी नव्हे तो बळीराजाच्या बी-बियाणे खरेदीसाठी लगबग करु लागले. यंदा खरीप अगदी वेळेवर सुरू होणार या आशेने बळीराजा दुप्पट जोमाने कामाला जुंपला आहे. मात्र ज्या नक्षत्रावर सर्वात जास्त भरवसा असतो त्या मृग नक्षत्रानेच पाठ फिरविल्याने आता खरीप हंगाम पुन्हा एकदा लांबणार का, अशी भिती शेतक-यांना वाटत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. पैठण तालुक्यातील मोजक्याच भागात थोड्याफार प्रमाणात मान्सूनपुर्व पाऊस झाला. काही भागात मात्र पेरणी योग्य पाऊस झालाच नाही. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होते. या काळात धो धो पाऊस पडून मातीचा सुगंध आसमंतात दरवळतो आणि बळीराजा खरिपाच्या पेरणीला सज्ज होत असतो. मात्र यंदा असे घडलेच नाही.
मृग संपत आला तरी पाऊस आलाच नाही. मागील आठवड्यात पाऊस येईल अशी शक्यता होती. मात्र ती फोल ठरली. या आठवड्यात तर पुन्हा एकदा उकाडा सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिसरात कपाशी, बाजरी, तूर, मका, कांदा, मूग आदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही परिसरात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळते असा शेतकNयांना विश्वास असतो. मात्र आता जुनचा तिसरा आठवडा सुरू झाला तरीही लागवड झाली नसल्याने कपाशी बरोबरच लाल कांदा, तूर आदी पिकांची पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाने मृत झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या वारसदारांना ५० लाखांचा विमा प्राप्त
- बीडच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुखांचा बदल, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
- पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, मिम्स शेअर करत सेहवागने व्यक्त केली नाराजी
- मायकेल वॉनने पुन्हा उडविली भारतीय चाहत्यांची खिल्ली ; म्हणाला, मला माफी मागावी लागेल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

