बीड : शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले. माजलगाव, परळी, केज विधानसभा मतदारसंघासाठी यापूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले सचिन मुळूक यांच्या जागी माजलगाव येथील अप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, विश्वासात न घेता जाधव यांच्या निवडीचा निर्णय घेतला गेला असून फेरविचार केला नाही तर सामुदायिक राजीनामे देण्याचा इशारा माजलगाव, परळी, केज मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बदलानंतर मंगळवारी एक पत्रक काढण्यात आले होते. यात सामूहिक राजीनामे देणार असल्याचे सांगत उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु हे नाव परस्परपणे टाकण्यात आलेले असून आपण बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक असून पक्षाशी एकनिष्ठ आहोत. पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असून आपण पदाचा राजीनामा देणार नसल्याचे उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत पिंगळे यांनी म्हटले आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर व पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवा सेनाप्रमुख तथा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यरत आहोत. एक सामान्य शिवसैनिक ते शाखाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख ही वाटचाल आपण पक्षाच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करत केली. सद्या उपजिल्हाप्रमुखपदाची धुरा वाहताना पक्षाचा समाजसेवेचा वसा आपण जोपासत आहोत.
दरम्यान, मंगळवारी शिवसेना जिल्हा पदाधिकारी निवडी झाल्यानंतर काही जणांनी आपल्या नावाने खोटी स्वाक्षरी करत राजीनामा देणार असल्याचा उल्लेख केला. वास्तविक आपण पक्षाच्या भुमिकेशी, पक्षाच्या प्रत्येक निर्णयाशी एकनिष्ठ आहोत. त्यामुळे आपण उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार नाहीत. पक्षाच्या प्रत्येक निर्णयाच्या प्रक्रियेशी आपण सहमत असून यापुढेही उपजिल्हाप्रमुख पदाच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत जोपासणार आहोत, असे पिंगळे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, मिम्स शेअर करत सेहवागने व्यक्त केली नाराजी
- मायकेल वॉनने पुन्हा उडविली भारतीय चाहत्यांची खिल्ली ; म्हणाला, मला माफी मागावी लागेल!
- चहलने केला जिमचा व्हिडीओ शेअर, ‘या’ क्रिकेटरने दिली सलमान खानची उपमा
- डब्ल्युटीसी फायनल! ‘गड गेला पण सिंह आला’ जडेजाची कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप


