इंग्लंड : न्यूझीलंड संघ कसोटी क्रिकेटचा पहिला जागतिक विजेता ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला 8 गडी राखून पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडने ही ट्रॉफी जिंकली. गेल्या दोन वर्षांपासून डब्ल्यूटीसीमध्ये चॅम्पियनसारखी खेळणारी टीम इंडिया या अंतिम सामन्यात फ्लॉप ठरली.
डब्ल्युटीसी स्पर्धेच्या या अंतिम सामन्यात न्युझीलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने पहिल्या डावात २१७ धावांची मजल मारली. भारताकडुन उपकर्णधार अंजिक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर न्युझीलंडकडुन कायली जेमीसनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २४९ धावांची मजल मारली. न्युझीलंडकडुन सलामीवीर डेवॉन कॉनवेने सर्वाधीक ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधीक ४ गडी बाद केले.
पहिल्या डावात न्युझीलंडला निर्णायक ३२ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने आश्वासक सुरुवात करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकही खेळाडू मोठी खेळी साकारण्यात अयशस्वी झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव केवळ १७० धावांवर अटोपला. यष्टीरक्षक रिषभ पंतने भारताकडुन सर्वाधीक ४१ धावांची खेळी साकारली. तर न्युझीलंडकडुन टीम साउथीने ४ गडी बाद केले. यासह चौथ्या डावात न्युझीलंडला सामना जिंकण्यासाठी १३९ धावांचे लक्ष्य होते. हे आव्हान न्युझीलंडने २ गडी गमावत सहज पुर्ण केले. कर्णधार केन विलियमसनने न्युझीलंडकडून सर्वाधीक ५२ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.
टीम इंडियाच्या या पराभवानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील ट्विटरवर एक मिम्स शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, असं मिम्स शेअर करत सेहवागने टीम इंडियाला सुनावले आहे. या पराभवानंतर अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
#INDvNZ pic.twitter.com/P6g8EuW10Z
— Virender Sehwag (@virendersehwag) June 23, 2021
महत्वाच्या बातम्या
- कर्णधार कोहलीने सांगितले पराभवाचे कारण, म्हणाला…
- ‘या’ कारणांमुळे झाला टीम इंडियाचा पराभव
- स्वप्न भंगले! भारताला नमवत न्युझीलंड बनला ‘विश्व चॅम्पियन’
- मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फडणवीस सरकारच्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय !
- इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

