🕒 1 min read
इंग्लंड : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला भारतीय संघावर वक्तव्य करून नेहमीच चर्चेत रहायला आवडते. ज्यामुळे भारतीय चाहते त्याला सोशल मीडियावर खेचण्यात मागेपुढे पाहत नाहीत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर आता वॉनने भारतीय चाहत्यांची चेष्टा केली आहे. वॉनने खर तर अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंडच्या विजयाची भविष्यवाणी केली होती, त्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले.
वॉनने ट्विट केले की, ‘मला समजले आहे की माझ्या चुकीच्या अंदाजासाठी मला काही तासांत हजारो भारतीय चाहत्यांकडे माफी मागावी लागेल. ज्यामध्ये मी असे म्हटले होते की न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकेल.’
I think I may need a few apologies from the thousands of Indian fans in a few hours for my awful prediction that NZ would win the Test championship final … #OnOn #TestChampionshipFinal
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 23, 2021
सामना संपल्यानंतर न्यूझीलंड जिंकण्यास पात्र आहे, अशी कबुली भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिली. कोहली म्हणाला, ‘सर्व प्रथम, केन आणि त्याच्या टीमचे अभिनंदन. त्यांनी संपूर्ण कसोटी सामन्यात आमच्यावर दबाव आणला आणि जिंकण्यासाठी एक उत्तम कामगिरी केली.
महत्त्वाचे म्हणजे अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 विकेट्सने पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जेतेपद जिंकले. सामन्याच्या सहाव्या दिवशी (राखीव दिन) भारताचा दुसरा डाव केवळ 170 धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने दोन विकेट गमावून 139 धावांचे लक्ष्य गाठले. मात्र, दुसऱ्या डावात न्यूझीलंडने एकाच वेळी त्यांचे दोन गडी 44 धावांवर गमावले. पण यानंतर, केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी मिळून संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. कर्णधार विल्यमसन 52 आणि टेलर 47 धावांवर नाबाद राहिले. काइल जेम्सनला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल गौरविण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- कर्णधार कोहलीने सांगितले पराभवाचे कारण, म्हणाला…
- ‘या’ कारणांमुळे झाला टीम इंडियाचा पराभव
- स्वप्न भंगले! भारताला नमवत न्युझीलंड बनला ‘विश्व चॅम्पियन’
- मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फडणवीस सरकारच्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय !
- इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
