Share

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Published On: 

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांचे पूजन करून आरोग्य विभागास त्या सुपूर्द करण्यात आल्या.

आरोग्य विभागासाठी एकूण १५ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ७ व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अंतर्गत ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना ८ रुग्णवाहिका मंगळवारी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार संदीप क्षीरसागर,आमदार संजय दौंड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आरोग्य यंत्रणेस आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येत असून पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून या १५ रुग्णवाहिका जिल्ह्यात प्राप्त झाल्या आहेत. याचा जिल्ह्यातील गोरगरिब व गरजु रुग्णांना फायदा होणार असून वेळेवर वैद्यकीय सेवा व संदर्भ सेवा रुग्णांना मिळण्यास यामुळे मदत होईल.

म्यूकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमानंतर जिल्हा रुग्णालयातील म्यूकरमायकोसिस वर उपचार करण्यात येणाऱ्या वॉर्डाची पाहणी केली. दाखल असलेल्या महिला रुग्णांची विचारपूस केली आणि डॉक्टर्स, नर्स यांच्याबरोबर चर्चा करून माहिती घेतली. त्यांनी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने मिळण्याच्या दृष्टीने सूचना केल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!