बीड : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीवावर उदार होऊन काम करत संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या शिरूर तालुक्यातील रायमोहा येथील आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. त्यांच्या वारसदारांच्या खात्यात ही विमा रक्कम जमा झालाय.
जिल्ह्यात कोरोनाच्या सुरुवातीपासून आशा स्वयंसेविका फिल्डवर काम करत आहेत. गावपातळीवर आरोग्य विभागाची सर्वात शेवटची घटक म्हणून पोहचणारी आशा ही व्यक्ती असते. विविध प्रकारचे सर्वेक्षण, बाहेर गावाहून आलेल्यांची माहिती जमा करणे, शासनाच्या सूचना पोहोचवणे अशी कामे आशांनी या काळात केली. या कामादरम्यान अनेक आशांना कोरोनाचा संसर्गही झाला. शिरूर तालुक्यातील रायमोहा येथील आशा स्वयंसेविका यमुना गहिनीनाथ नेमाणे यांनाही ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोना संसर्ग होता होता.
८ ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोनाशी झुंज देताना मृत्यू झाला. जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नेमाणे यांना आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ५० लाखांच्या विमा योजनेसाठी प्रस्ताव पाठवला गेला होता. सीईओ अजित कुंभार, एसीईओ आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार व तालुका आरोग्य अधिकारी अशोक गवळी यांनी यासाठी पाठपुरावा केला.
महत्वाच्या बातम्या
- बीडच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुखांचा बदल, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
- पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, मिम्स शेअर करत सेहवागने व्यक्त केली नाराजी
- मायकेल वॉनने पुन्हा उडविली भारतीय चाहत्यांची खिल्ली ; म्हणाला, मला माफी मागावी लागेल!
- चहलने केला जिमचा व्हिडीओ शेअर, ‘या’ क्रिकेटरने दिली सलमान खानची उपमा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
