Share

स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकाने मनपा अधिकाऱ्यांना दिला ‘चकवा’!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : केंद्राच्या स्वच्छता मिशनअंतर्गत औरंगाबाद महापालिकेने केलेल्या कामगिरीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाकडून शहराचे स्वच्छ सर्वेक्षण केले जात आहे. या पथकाने शुक्रवारी (दि.९ ) पालिकेच्या अधिकाऱ्यांना कचरा केंद्रांवर येणार असल्याचे सांगितले मात्र एेनवेळी पथक शहरातच गस्त घालत असल्याचे दिसून आले. पथकातील नागरिकांना कचरा नियमीत उचलला जातो का, घंटागाडी येते का, वर्गीकरण केलेला कचरा घंटागाडीत घेतला जातो का, घंटागाडीत कचरा वेगवेगळा असतो का असे विविध प्रश्न विचारले.

यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात कचरामुक्त शहर ही संकल्पना राबवली जात आहे. त्यानुसार शहरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाचे दोन दिवसांपासून काम सुरु आहे. गुरुवारी या पथकाने व्यावसायिक भागात जाऊन पाहणी केली. व्यावसायिक भागाला जोडून असलेल्या निवासी भागात देखील जाऊन पथकाने तेथील नागरिकांशी स्वच्छतेविषयक बाबींवर संवाद साधला. स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांनाच चकवा देत, तुम्ही आमच्या बरोबर येऊ नका, आम्हाला आमचे स्वतंत्र फिरु द्या, नागरिकांशी संवाद साधू द्या, म्हणत या पथकाने पालिकेच्या अधिकार्‍यांना दूरच ठेवले.

सूत्रांच्या माहितीनुसार पथकाने पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकार्‍यांना आपण कांचनवाडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी येणार आहोत, असे सांगितले. तेव्हा पालिकेने त्या ठिकाणी जय्यत तयारी केली. सकाळपासूनच ठराविक कर्मचारी कचरा प्रक्रिया प्रकल्पावर बसवले होते. मात्र सायंकाळी पाच वाजले तरी केंद्रीय पथक तेथे आलेच नाही. दरम्यान, हे पथक निवासी क्षेत्रात पाहणी करण्यासाठी गेले होते. पथक पालिकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांना सोबत न घेता शहरभर फिरत असल्याने पालिका अधिकार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!